जिंतूर : घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील पाच लाख रुपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा सव्वा आठ रुपयाचा माल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
गणपती गल्ली येथील बालाजी प्रल्हाद काळे हे औरंगाबादला गेले होते. तर त्यांचे आईवडील उपचारासाठी नांदेड येथे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले पाच लाख रुपये नगदी, दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन ,सोन्याच्या अंगठ्या, कानातील चैन,झुंबर , चांदीचे भांडे व घरातील पंचवीस हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी एकूण आठ लाख तीस हजार रुपयांचा माल लंपास केला.
Video : नामी शक्कल ! पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार
सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांनी बालाजी काळे यांना फोनवरून सांगितले. घटनेच्या तपासासाठी परभणी येथून श्वानपथकाचे पाचारण करण्यात आले. श्र्वानाने घरापासून काही अंतरावर माग दाखवला. परंतु, त्यानंतर चोरटे वाहनाने पसार झाले असावेत असा अंदाज आहे. गतवर्षी शहरात झालेल्या चोरीच्या अनेक घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसताना या चोरीच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.