लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़परभणी जिल्ह्यात १० राष्ट्रीयकृत बँका असून, या बँकांमधील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी ३० मे रोजी संप पुकारला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्व अधिकारी, कर्मचारी दाखल झाले; परंतु, या कर्मचाºयांनी कामकाज न करता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली़ यावेळी इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या़ युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये समाविष्ट असलेल्या ९ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते़ मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाºयांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़ डॉ़ सुनील टाके, डॉ़ सुनील हट्टेकर, भास्कर विभुते, अशोक पिल्लेवार, सौरभ देगावकर, प्रशांत जोशी, रणजीत काकडे, बालासाहेब साठे, प्रणयकुमार विश्वास, चंद्रकांत लोखंडे, योगेश गुंडाळे यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले़ परभणी जिल्ह्यातील १९ बँकांमधील सुमारे ८०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे़गुरूवारीही असणार संपयुनायटेड फोरम आॅफ बँक या संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, ३१ मे रोजीही हा संप केला जाणार आहे़ गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातील बडोदा बँकसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत़ बुधवारचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. स्टेट बँकेच्या पेन्शनर्स असोसिएशनने संपात सहभाग नोंदविला़ यावेळी राम खरटमल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़बँकींग व्यवहार विस्कळीतजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका बंद असल्या तरी स्थानिक बँकांचे कामकाज सुरू होते़ मात्र बंदमुळे आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लेरसन्स या सेवा विस्कळीत झाल्या होत्या़ राष्ट्रीयकृत बँका बंद असल्याने जवळपास २ हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकांमधील सूत्रांनी दिली़ तसेच शहरातील एटीएम मशीनमध्ये खडखडाट दिसून आला़ त्यामुळे ग्राहकांची धावपळ झाली़
परभणी जिल्ह्यात २ हजार कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:40 AM