परभणी : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात येथील निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह इतर दोन आरोपींना न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सेवानिवृत्त शिपाई हसनोद्दीन शमशोद्दीन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ एप्रिलला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच पकडले होते. त्यानंतर बोधवड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील पेशकार शेख इसरार शेख उस्मान याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यावरुन एसीबीच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले. रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक नारायण बेंबडे यांनी गुन्हा नोंदवला. (प्रतिनिधी)
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांनाही कोठडी
By admin | Published: April 19, 2017 2:41 AM