शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

थरारक ! पुरात वाहून आलेल्या कारची काच फोडून नागरिकांनी चालकाला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:25 PM

पुलाच्या बांधकामास गाडी अडकल्यानंतर काही नागरिकांनी जीवाची पर्वा न तिकडे धाव घेतली.

ठळक मुद्देवेगवान प्रवाहाने गाडी उलटली आणि पुढे वाहत गेली काही नागरिकांनी जीवाची पर्वा गाडीचा पाठलाग केला

पाथरी : राज्य महामार्ग- ६१ वर हदगाव ( बु ) गावाजवळ बांधकाम सुरू असलेल्या पुलास पुरात वाहून आलेली एक कार अडकली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी कारची मागील काच फोडून चालकाला वाचवल्याने त्याचे प्राण वाचले. पूर आलेला असताना नागरिकांनी स्व: च्या जीवाची पर्वा न करता एकाचे प्राण वाचविल्याची ही थरारक घटना रविवारी ( दि. ११) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य मार्ग 61 च्या आष्टी - पाथरी या रस्त्याचे काम सध्या पाथरी भागात सुरू आहे. हदगाव ( बु ) गावाजवळ याच रस्त्यावर दोन पुलाचे बांधकाम ही सुरू आहे. पुलातून या भागातील ओढ्या नाल्याचे पाणी वाहते. रविवारी ( दि. ११) सायंकाळी या भागात चांगला पाऊस पडल्याने रात्रीच्या वेळी हदगाव ( बु ) गावाजवळ असणाऱ्या पुलाला पाणी आले. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील मरडसगाव श्रीरामपूर वस्ती येथील रहिवासी रंगुनाथ दत्तू मुंढे हे आपली कार ( एम एच 12 बी एस 7885 ) ने पाथरीहून गावाकडे जात होते. वळण रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी पुढे वाहत गेली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. 

वेगवान प्रवाहाने गाडी उलटली होती. तसेच पाण्याची पातळी वाढत जात होती. या परिस्थितीमध्ये मुंढे गाडीतच अडकले. त्यांची बाहेर पडण्याची धरपड सुरु होती. दरम्यान, वाहत जाणाऱ्या गाडीचा काही नागरिकांनी पाठलाग केला. पुढे पुलाच्या बांधकामास गाडी अडकल्यानंतर काही नागरिकांनी जीवाची पर्वा न तिकडे धाव घेतली. काहींनी प्रसंगावधान राखून तत्काळ गाडीची  मागची काच दगडाने फोडली. यानंतर मुंढे यांना नागरिकांनी गाडीमधून सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघातparabhaniपरभणी