गंगाखेड रस्त्याला पडले तडे
परभणी : गंगाखेड ते परभणी या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक भागात रस्त्याला तडे पडले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या या मार्गावर पुलांची कामे सुरू असून सिमेंट काँक्रीट रस्त्याला तडे गेले आहेत.
प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शहरात वापर
परभणी : शहरात प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरास बंदी असतानाही बाजारपेठ भागात मात्र या कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. मनपा प्रशासनाने प्लॅस्टिकविरुद्धची मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कर वसुली ठप्प
परभणी : शहरातील मनपाची वसुली ठप्प पडली आहे. मनपाची पथके वसुलीसाठी फिरत नसल्याने त्याचा फटका मनपाला बसत आहे. नागरिकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे.
दुर्गंधी पसरली
परभणी : शहरातील गांधी पार्क भागात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असून या भागात दुर्गंधी वाढली आहे. मनपाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.