लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा पोलीस दलात सध्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, पोलीस अधीक्षकांनी कर्मचाºयांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविले आहेत़पोलीस प्रशासनाच्या वतीने दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जातात़ ज्या कर्मचाºयांना सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणी ३१ मे २०१९ रोजी पाच वर्षे खंडीत किंवा अखंडीत सेवा किंवा नेमणुुकीच्या तालुक्यात १२ वर्षांची सेवा झाली असेल किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचाºयांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत़ संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांनी ७ मेपर्यंत हे अर्ज दाखल करावयाचे आहेत़ त्यामध्ये बदली पात्र कर्मचाºयास त्याच्या पसंतीचे तीन पोलीस ठाणे, शाखा नमूद करण्याची मुभा देण्यात आली आहे़ पसंतीचे पोलीस ठाणे कळविताना त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या असून, त्यात पसंतीच्या पोलीस ठाण्यामध्ये स्वग्राम, तालुका आदींचा समावेश नसावा़ पसंतीचे पोलीस ठाणे ज्या तालुक्यात आहे, त्या तालुक्यात यापूर्वी १२ वर्षे सेवा झालेली नसावी, तसेच पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा केलेली नसावी, तसेच ज्या कर्मचाºयांनी सीट रिमार्कच्या वेळी बदली संबंधात विनंती केली असेल व अशा कर्मचाºयांना सर्वसाधारण बदलीच्या वेळी विचार केला जाईल, असे आश्वासन दिले असल्यास त्याचा अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा आदी सूचना दिल्या आहेत़ त्यामुळे सध्या पोलीस दलातील कर्मचारी इच्छुक ठिकाणी बदली मिळविण्यासाठी अर्ज करण्यात गुंतले आहेत़ लवकरच अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे़कर्मचाºयांनाच करावा लागेल अर्ज४ज्या कर्मचाºयांना त्यांच्या सेवा काळात एकाच तालुक्यात १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे किंवा ज्यांची एकाच पोलीस ठाण्यात, शाखेत पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांनी आणि ते कर्मचारी मूळ तालुक्यातील पोलीस ठाण्यात नेमणुकीला असतील अशा कर्मचाºयांनी स्वत: इतरत्र बदली करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे़४जर त्या कर्मचाºयानी अशा स्वरुपाचा अर्ज केला नाही तर त्यांना वैयक्तीक जबाबदार समजले जाईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत़ दरम्यान, बदल्या करताना पसंतीच्या पोलीस ठाण्यात रिक्त पदे उपलब्ध नसतील किंवा काही प्रशासकीय अडचण असल्यास प्रशासनाच्या सोयीनुसारच बदल्या केल्या जातील़ या बदल्यांसाठी पोलीस दलातील अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती निर्णय घेणार आहे़मे महिन्यात होते प्रक्रिया४सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्येच पोलीस दलातील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जातात़ जून महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होते़४या काळात बदली झालेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांची गैरसोय होऊ नये, तसेच इतर अनेक बाबींचा विचार करून मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातात़ त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे़
परभणी जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:55 PM