११ जुलै रोजी परभणी येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी कौडगावचे पोलीस पाटील तुकाराम रेंगे पाटील यांची निवड झाली. त्याचप्रमाणे, उपाध्यक्षपदी पिंगळीचे पोलीस पाटील उमेश खाकरे, मुंजाजी सोळंके (रुमना), गजानन शिंदे (हदगाव), कार्याध्यक्षपदी बाळासाहेब काळे (सावळी), जिल्हासचिव ज्ञानोबा काटकर (कात्नेश्वर), जिल्हा संघटक दशरथ सवराते (आलेगाव), कोषाध्यक्ष प्रा.नारायण आडे (बोथी ), सहसचिव उत्तमराव उघडे (बाभळी), सदस्य सीताराम गायकवाड (गुंज), माधव दुधाटे (खांबेगाव), अनंतरावजी कदम (आर्वी) यांची निवड करण्यात आली, तसेच यावेळी महिला कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात महिला जिल्हाध्यक्षपदी गोदावरीताई शिंदे (मसला), जिल्हा उपाध्यक्ष मीराताई धनले, सचिवपदी रेणुकाताई डुबे, मीनाक्षीताई चोपडे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस राज्यकार्यकारिणी अध्यक्ष श्रीकृष्णजी साळुंखे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष जब्बारभाई पठाण, विभागीय सहसचिव टेमकर, नांदेड जिल्हा सचिव उपस्थित होते.