बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत तयारी केली नाही. मात्र बारावी इयत्तेत असताना ठरावीक ध्येय समोर ठेवून तयारी केली. तसेच अकरावी परीक्षेसह काही विद्यार्थ्यांनी महत्त्व दिलेले नसते. या विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे निकालाचे सूत्र चिंता वाढविणारे ठरत आहे.
.....................
अकरावीची परीक्षा आम्ही गांभीर्याने घेतली नव्हती; त्यामुळे शासनाच्या धोरणाचा निकालावर परिणाम होऊ शकतो. तसेच हा निर्णय घेतानाही खूप उशीर केला. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी शासनाने निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे.
- कलश अग्रवाल, विद्यार्थी
दोन वर्षांपासून लाॅकडाऊनच आहे. अकरावीच्या परीक्षेचे गुणही असे इमॅजनरी आहेत. त्यामुळे माझा अकरावीचा स्कोअर खूपच कमी आला. अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याने चिंता वाटते.
- खुशी दोषी, विद्यार्थिनी
बारावीच्या परीक्षेसाठी दहावीचे गुण ग्राह्य धरण्याचे सूत्र योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक विद्यार्थ्यांनीही तसे बोलून दाखविले आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे काही विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी चिंता न करता पुढील परीक्षेवर फोकस करावा.
- संदीप जैस्वाल
कोविडच्या संसर्गामुळे बारावी परीक्षेत गुणदानाचे सूत्र निश्चित झाले आहे. यात काही विद्यार्थी निश्चितच चिंतेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी अधिक चिंता न करता पुढील परीक्षांची जोमाने तयारी करावी. त्यांच्या करिअरवर अधिक भर द्यावा.
-प्रा. व्ही. बी. गायकवाड