परभणी तालुक्यातील प्रजिमा ३५ ते जोड परळी रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ९९ लाख १७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिंतूर तालुक्यातील राज्य मार्ग २४८ ते बोरी-वर्णा-निवळी या रस्त्यावरील बुडीत पुलासाठी ४ कोटी ११ लाख ९३ हजार रुपये, मानवत तालुक्यातील राज्य मार्ग ६१ ते रामपुरी, थार वांगी-वझूर रस्त्यावरील बुडीत पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ९१ लाख ७७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यातील राज्य मार्ग २२१ ते खैरी सावंगी या रस्त्यावरील बुडीत पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २१ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या चारही पुलांच्या कामानंतर ५ वर्षे नियमित देखभाल व दुुरुस्तीसाठी ८ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश ग्रामविकास विभागाने १५ मार्च रोजी काढले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या या रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धरतीवर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलाअभावी या भागातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय यानिमित्ताने दूर होणार आहे. आता या संदर्भातील टेंडर प्रक्रिया होणार आहे. ३० मीटरपेक्षा जास्त लांबीच्या पुलाच्या संकल्प चित्रास सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी घेण्याचे आदेश दिले आहेत.
चार पुलांसाठी सव्वाबारा कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:18 AM