शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

By मारोती जुंबडे | Published: October 07, 2022 3:43 PM

वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

जिंतूर : विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ७ ते ८ जण जखमी झाले असून जिंतूर पोलिसात दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जिंतूर येथे ६ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात सुरू झाली. जिंतूर गणेशोत्सवापाठोपाठ दुर्गादेवीच्या मिरवणुकीतही डीजेची धूम राहिली. कर्णकर्कश आवाज व धुंद झालेली तरुणाई बेधुंद होऊन नाचताना दिसली. हर्ष, उत्साहात सुरू असलेल्या या मिरवणुकीला चौक बाजाराच्या जवळ गालबोट लागले. मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे या हाणामारीत फायटर, चाकू यांचा सर्रास वापर करण्यात आला. दोन धर्मीयांमध्ये झालेल्या भांडणाचे स्वरूप वाढते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली.

या राड्यामध्ये ६ ते ७ जण जखमी झाले. यावेळी दोन गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात कृष्णा संजय आनंदे यांनी जिंतूर परिसरात फिर्याद दिली की, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत फिर्यादी व त्याचा मित्र नाचत असताना शहनाझ सिद्दिकी यास धक्का लागल्याने बाचाबाची झाली. त्यावेळी शहनाझ सिद्दिकीने हातातील फायटरने फिर्यादी व साक्षीदार यांच्या डोक्यात मारून जखमी केले. शिवाय शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, तर चाकूनेही रवी कुलथे यास जबर जखमी करण्यात आले. या फिर्यादीवरून आरोपी शहनाझ सिद्दिकी, निजाम सिद्दिकी, सुलेमान सिद्दिकी, संतोष टाक व इतर तीनविरुद्ध जिंतूर पोलिसात पोलीस उपनिरीक्षक खोले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहनाझ सिद्दिकी यांनी जिंतूर पोलिसात तक्रार दिली की, तुम्ही आमच्या डीजेसमोर का आलात इथून निघून जा, असे म्हणत फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, फायटरने मारहाण करून साक्षीदार संतोष टाक यांच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून संतोषचे वडील नंदू टाक यांना मारहाण केली. म्हणून आरोपी कृष्णा आनंदे, महेश बाराते, कृष्णा कुलथे, रवी कुलथे, मयूर चांदजकर, विजय कुलथे, संजय आनंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीत सहा ते सात जण जखमी झाले आहेत.

पोलीस यंत्रणा कुचकामीमागील काही दिवसांपासून जिंतूर शहरामध्ये पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कायद्याचा धाक न राहिल्याने गुन्हेगारांना आयतेच रान मिळाले आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीच्या दरम्यान पोलीस यंत्रणेने पुरेसा बंदोबस्त व मिरवणुकीमध्ये मद्य प्राशन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. यापूर्वीचा इतिहास पाहता संबंधित यंत्रणेने मिरवणूक गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसते.

श्रवण दत्त यांच्या आठवणीला उजाळावेगवेगळे उत्सव व निवडणुकीदरम्यान गुन्हेगारांवर वचक कसा असावा, याचा प्रत्यय श्रवण दत्त यांच्या काळातील तीन वर्षात आला. मिरवणुकीत तर सर्रास शस्त्रांचा वापर करण्यात आला. याबाबत पोलीस यंत्रणा अनेकांना अभय देत असल्याचे दिसत आहे. यंत्रणेत जर कुचकामी असेल तर गुन्हेगारावर काय वचक राहणार हाच प्रश्न आता जिंतूरकरांना निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी