गोंडगे पिंपरी येथील लोकसंख्या १ हजार ८०० तर शिंगठाळा येथील लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. या दोन्ही गावांना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. परंतु, थकित वीजबिलामुळे महावितरणकडून या दोन्ही गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा बंद असून दळणवळण, मोबाईल सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय वाढली आहे. त्याचबरोबर तीन दिवसांपासून ही दोन्ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य मीनाक्षी गोंडगे, सुमनबाई गोरे, शोभा गोरे, प्रल्हाद गोरे, सतीश गोंडगे, प्रल्हादराव गोंडगे, दिनकर गोरे, गणेश काजळे, बाळी खाडे, किशनराव हुलगुंडे, भीमराव निकाळजे, उद्धव घोडगे, सुभाष घोडके, विष्णू बर्वे, तुकाराम शिंगाडे आदींनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाकडे केली आहे.
दोन गावे तीन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:25 AM