- अनिल शेटेगंगाखेड ( परभणी): लोहा ते गंगाखेड मार्गावरील मालेवाडी पाटीजवळ आज सकाळी ( दि.२५) सकाळी १० वाजता मोटारसायकल आणि बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील आजोबा आणि नातू हे दोघे जागीच ठार झाले. श्रीनिवास शिंदे ( २२) आणि शिवाजी किशनराव शिंदे ( ७० ) अशी मृतांची नाव आहेत.
पालम तालुक्यातील रावराजुर श्रीनिवास शिंदे ( २२) हा आजोबा शिवाजी किशनराव शिंदे ( ७० ) यांना मोटारसायकलवरून गंगाखेड येथील दवाखान्याकडे घेऊन निघाला होता. दरम्यान, नांदेडकडे जाणारी बस ( एम.एच.४० एन.९९०१ ) समोरून येत होती. मालेवाडी पाटीजवळ मोटारसायकल आणि बसचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरून आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी मृतदेह गंगाखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. अपघाताची वार्ता समजताच रावराजूर ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.