लोकमान्य टिकळ यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या रॅलीला खा. संजय जाधव यांनी झेंडी दाखवून उद्घाटन केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. खा. संजय जाधव, आ. मेघना बोर्डीकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश वडदकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, वैघकीय अधीक्षक डाॅ. संजय हरबडे, माजी सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, दादासाहेब टेंगसे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आदींची उपस्थिती होती. रॅली मार्गावर रांगोळी, जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. ही रॅली गणपती गल्ली, गोविंद बाबा चौक, स्टेशन रोड मार्ग, हुतात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत कचरा मुक्त शहर, प्लाटिक वापर आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सायकलचे महत्त्व पटवून देण्यात आले. जिंतूर, परभणी येथील सायकलिंग क्लबचे सदस्य रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना वसुंधराची शपथ देण्यात आली. स्वच्छता आणि प्लाटिक बंदीसाठी काम करणारे अरुण रामपूरकर यांचा सत्कार करण्यात आला. जिंतूर येथील शाहेद खान आणि परभणी सायकलिंग क्लबचे शंकर फुटके यांनी सायकल वापराचे फायदे सांगितले. प्रास्ताविक नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले, तर आभार गिरीश लोडाया यांनी मानले.
प्लास्टिक सायकलचे आर्कषण
नगरपालिकेने प्लाटिकमुक्तीचे प्रबोधन करण्यासाठी टाकाऊ प्लाटिकपासून सायकलची प्रतिकृती तयार केली होती. रॅलीच्या अग्रभागी होती. ही सायकल सर्वांचे आर्कषण बनली. ट्रॅक्टरवर ठेवलेली सायकल पाहण्यासाठी बच्चे कंपनीने गर्दी केली. सेलूत सायकलिंग ट्रॅक तयार करण्यासाठी पूर्ण मदत करण्याची ग्वाही आ. मेघना बोर्डीकर यांनी केली. स्वच्छतेत देशात शहराचा २६ क्रमांक आहे. पहिल्या पाचमध्ये शहर आणण्याची तयारी असल्याचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सांगितले.
खासदार, आमदार सायकलवर
सायकल रॅलीत खा. संजय जाधव, आ. मेघनाताई बोर्डीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, अशोक काकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, वैघकीय अधीक्षक डाॅ. संजय हरबडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, व्यापारी आणि विद्यार्थी सायकल चालवत समारोप स्थळी पोहोचले. त्यामुळे रॅलीचे आकर्षण अधिकच वाढले.