सेलू तालुक्यातील ९५ गावे ही ४ पोलीस स्टेशनला जोडली गेली आहेत. यामध्ये सेलू पोलीस स्टेशनमध्ये ५९ गाव तर चारठाणा पोलीस स्टेशनमध्ये २४ गावे, बोरी पोलीस स्टेशनला १० गावे तर पाथरी पोलीस स्टेशनमध्ये २ गावाचा समावेश करण्यात आला आहे. गावकीच्या भांडण तंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असल्याने यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते. परंतु, सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत १८ गावे तर चारठाणा पोलीस स्टेशन अंतर्गत ११ पाथरी व बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी १ अश्या एकूण ३१ गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या गावातील कायदा-सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे ही कामे या गावात विस्कळीत झाली आहेत. सेलू उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सेलू तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे.
या गावात पदे रिक्त
सेलू पोलीस स्टेशन अर्तगत प्रिंप्रुळा, ढेंगळी पिंपळगाव, खादगांव, खुपसा,कुंडी, ब्राम्हणगांव प्र.को.,डुघरा,राजा,राजवाडी, डिग्रस खु,साळेगांव, खेर्डा दु.की,ब्रम्हवाकडी, रायपूर, तिडी पिंपळगाव, सिध्दनाथ बोरगांव, गोहेगांव, डिग्रस जहाँगीर, बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत कुपटा, चारठाणा पोलीस स्टेशन अंतर्गत वाई, गोंडगे पिंपरी, सिंगठाळा, देवगांवफाटा, बोरकीनी, निरवाडी बु, निरवाडी खु, सावंगी पी.सी, गिरगांव खु, गिरगांव बु,केमापूर तर पाथरी पोलीस स्टेशन लाडनांदरा गावांचा समावेश आहे.
■ पोलीस पाटील रिक्त पदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरारून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी, सेलू