मागील सहा ते सात दिवसांपासून लसीकरणाला वेगवेगळ्या कारणांनी ब्रेक लागला होता. २ दिवस केवळ कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते. यानंतर शनिवारी पहिल्यांदाच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले. हे दोन्ही डोस जवळपास २०० उपलब्ध होते. यामध्ये १०० ऑनलाइन नोंदणी तर १०० स्पाॅट नोंदणीसाठी उपलब्ध होते. शनिवारी व रविवारी लस घेण्यासाठी जायकवाडी, बाल विद्यामंदिर, खानापूर, इनायतनगर, वर्मानगर, शंकरनगर यासह अन्य ठिकाणी नागरिक हजर होते. यामुळे दिवसभर बहुतांश केंद्रांवर लसीचा असलेला साठा सायंकाळपर्यंत संपल्याचे दिसून आले. सर्वच वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले. यामध्ये १८ ते ४४ व ४५ वर्षाच्या पुढील नागरिक, महिला, तरुणांनी लसीकरण करून घेतले. रविवारी बहूतांश केंद्रावर सकाळी टोकण घेण्यासाठी आणि लस घेण्यासाठी नागरिक सकाळी ११ पासून आले होेते. यामुळे लसीकरण केंद्र गर्दीने गजबजले होते.
लसीकरण केंद्र नागरिकांच्या गर्दीने गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:13 AM