परभणीमध्ये मागील आठवड्यात थंडीची लाट निर्माण झाल्याने भाजीपाल्याबरोबरच फळांचे भावही वधारले आहेत. थंडीमुळे भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटली असून, सर्वच भाजीपाल्याचा भाव ५ ते १० रुपयांनी वाढला आहे.
थंडीमुळे भाजीपाल्याची आवक चांगलीच घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. फुलकोबी १५ ते २० रुपये किलो, पानकोबी १० ते १२ किलो, मेथीची जुडी ४ ते ५ रुपये, मिरची २५ रुपये किलो, कांदा ६ ते ८ रुपये, बटाटे १० ते १२ रुपये किलो, या ठोक दराने विक्री झाले. फळांची आवकही घटल्याने फळांचे भावही वाढले आहेत.
ठोक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार ८०० ते ९०० रुपये क्विंटल दराने विक्री होणारी केळी १ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेली आहे. टरबूज ५ रुपये किलो, खरबूज १० ते १२ रुपये किलो आणि डांळिबाचे भावही ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.