शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परभणी जिल्ह्यातील तेरा लाख मतदारांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:25 AM

जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ही अर्हता मानून मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित केला आहे़ मतदार पडताळणी कार्यक्रमांंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनरिक्षण केले जात आहे़ ११ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम १५ मे २०२० पर्यंत चालणार आहे़ या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बीएलओंमार्फत मतदारांपर्यंत पोहचून त्यांची पडताळणी करण्यात आली़ २९ फेब्रुवारीपर्यंत पडताळणीचा हा कार्यक्रम चालणार असून, त्यानंतर १३ मार्च रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ जिल्ह्यात १५०४ मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रनिहाय बीएलओंच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात आली़ आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी १३ लाख १९ हजार २९७ मतदारांपर्यंत निवडणूक विभागाचे कर्मचारी पोहचले असून, या माध्यमातून मतदारांच्या नावात बदल करणे, मयत मतदार, स्थलांतरित मतदार, मतदान केंद्राचा बदल आदी पडताळणी करून मतदारांच्या सोयीनुसार मतदार यादीत बदल करण्यात आले आहेत़ या कामात राज्याच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याने ११ वे स्थान मिळविले असून, ९४़२८ टक्के काम जिल्ह्यामध्ये झाले आहे़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अव्वल कारकून नानासाहेब भेंडेकर यांनी वेळोवेळी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे निवडणूक विभागाने पडताळणी कार्यक्रमात ९४ टक्के काम पूर्ण केले आहे़ २९ फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून, सर्व मतदारांपर्यंत कर्मचारी पोहचतील आणि मतदार यादीतील नावांची पडताळणी पूर्ण केली जाईल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे़२२ हजार ६७१ मतदारांच्या नावांची दुरुस्ती४या कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या अर्जानुसार २२ हजार ६७१ मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ जिंतूर मतदार संघात १० हजार ३५१, परभणी २ हजार ६५३, गंगाखेड ७ हजार २६४ आणि पाथरी मतदार संघात २ हजार ४०३ मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे ९६३ मतदारांचे छायाचित्र दुरुस्त करण्यात आले़ तसेच ३० मतदारांचे नावे स्थलांतरित करण्यात आली़ ६ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत़२४ हजार मतदारांच्या वयात दुरुस्ती४जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ हजार १९८ मतदारांच्या वयामध्ये दुरुस्ती करण्याचे अर्ज या कार्यक्रमांतर्गत प्राप्त झाले होते़४त्यानुसार वयामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ जिंतूर विधानसभा मतदार संघात १५ हजार ६८३, परभणी १ हजार ८५८, गंगाखेड ३ हजार ८४६ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात २ हजार ८११ मतदारांच्या वयामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक