पालम (परभणी ) : तालुक्यातील चोटोरी ते बोरगाव या रस्त्यावर गळाटी नदीला पूर आला आहे. या पूरात अडकलेल्यांना गावात सोडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर ग्रामस्थांनी केला आहे. जेसीबीच्या पुढील भागात बसून जीवघेणी कसरत करत ग्रामस्थ गाव गाठत आहेत.
चोटोरी ते बोरगाव या रस्त्यावर असलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे ५ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावात ३० आगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पुलावर पूराचे पाणी आले. यामुळे रस्ता बंद पडल्याने कामानिमित्ताने चाटोरी , गंगाखेड, पालम येथे गेलेले नागरिक अडकून पडले. पुरातून जाण्याचा धोका न पत्करता अनेक ग्रामस्थ पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. तर काहींनी नामी शक्कल लढवत पुरातून जाण्यासाठी जेसीबीचा वापर केला. ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने आजूबाजूचे काटेरी झुडपांची साफसफाई केली. नंतर जेसीबी मशीनची कॅबीन, समोरील खोऱ्यात बसून पूल पार केला.
पहा व्हिडिओ :