जिल्ह्यात अवैधरित्या मोठ्याप्रमाणात शस्त्रे आणली जात असल्याचे मागील काही कारवाईवरून स्पष्ट होत आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक १२ जुलैरोजी शहरात गस्त घालत असताना येथील गुरू गोविंदसिंगनगर भागात एका घरामध्ये अवैध शस्त्र साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून आरोपी रवीसिंग रघुवीर सिंग याच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी भरमार बंदूक, तलवार आणि खंजिर असे शस्त्र घरात आढळले. पोलिसांनी ही तिन्ही शस्त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वेंकटेश आलेवार, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्यासह पथकाने केली
जिल्ह्यात मागील काही दिवसात अवैधरित्या शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन कारवाया केल्या असून, या तीनही कारवायांमध्ये बंदुका आणि तलवारी यासारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.