परभणी : तालुक्यातील नागापूर येथे एका घरात लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारवाई करीत जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे एक पथक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना तालुक्यातील नागापूर येथील सतीश नामदेव कुरवळे याच्या घरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे दोन पंचासमक्ष शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकण्यात आला. त्यात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपी सतीश कुरवळे यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे या पिस्तूल संदर्भात माहिती विचारली तेव्हा शेख गफार शेख अब्दुल याच्याकडून हे पिस्तूल घेतल्याचे कुरवळे याने सांगितले. त्यावरून शेख गफार यासही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, भिसे, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.