परभणी : लोकप्रबोधनाचा विचार, वारणा जोपाणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, अभ्यासकांना हेतुपुरस्सर गजाआड केले जात आहे. या विरोधात देशभर लोकचळवळीचा आवाज बुलंद व्हावा, अशा भावना रिपब्लिकन पँथर्सच्या हर्षाली पोतदार यांनी व्यक्त केल्या.
येथील बी. रघुनाथ सभागृहात रविववारी संविधान बचाव परिषद पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विजय वाकोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अनिता सोनकांबळे, मौलाना रफियोद्दीन अशरफी, बी.एच. सहजराव, डॉ. संग्राम मौर्य, बाळासाहेब गरुड, माजी सभापती रवी साेनकांबळे, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे, संविधान बचाव समितीचे काॅ. राजन क्षीरसागर, वंचितचे डॉ. धर्मराज चव्हाण, आशिष वाकोडे, राणूबाई वायवळ, एन.आय. काळे, बापूराव वाघमारे, सुमित जाधव, डॉ. प्रवीण कनकुटे, जफर खान, मौलाना जहांगीर नदवी, प्रदीप वाव्हळे, किरण घोंगडे, भीमराव वायवळ, राजकुमार सूर्यवंशी, कचरू गोडबोले, अर्जुन पंडित, चंद्रकांत लहाने, अशोक उबाळे, देवा महामुने, सिद्धार्थ कसारे, सुधाकर वाघमारे, संजय भराडे आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात वियज वाकोडे म्हणाले, भीमा कोरेगाव हल्ल्याचा तटस्थपणे तपास करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटी स्थापन करावी, या प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यशवंत मकरंद यांनी प्रास्ताविक केले. गणपत भिसे यांनी परिषदेची भूमिका विशद केली. प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भदन्त कश्यप महाथेरो यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. या परिषदेत भारतीय संविधानाचा समावेश इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व अभ्यासक्रमात करावा, शेतकरी विरोधी कायदे, सीएए, एनआरसी कायदा रद्द करावा, भीमा कोरेगाव हल्ल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करावी आदी ११ ठराव पारीत करण्यात आले. राहुल वहिवाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुनील जाधव यांनी आभार मानले.