या निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या गावातील निकालांनी लक्ष वेधून घेतले होते. उक्कलगाव येथील निवडणुकीत पं.स. सभापती प्रमिला उक्कलकर यांच्या पॅनलला अवघी एका जागा मिळवता आली. प्रतिस्पर्धी विद्यमान सरपंच नाथा पिंपळे यांनी ८ जागेवर दणदणीत विजय मिळवला. उपसभापती कमल शिवाजी हिंगे यांच्या कोथळा गावात हिंगे यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. प्रतिस्पर्धी दत्तराव पाते यांनी ९ पैकी ९ जागा जिंकून हिंगे यांना धक्का दिला. रामेटाकळी येथील ९ पैकी ९ जागा जिंकत माजी जि.प. सदस्य गंगाधरराव कदम यांचा पॅनलने विजय मिळवला. रामपुरी बु. येथे पंचायत समिती सदस्य शैलेश यादव यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला. कोल्हा येथे पंचायत समितीचे माजी सभापती नारायण भिसे यांच्या पॅनलने ११ पैकी ९ जिंकत विजय मिळवला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट यांच्या पॅनलने सारंगापूर येथे ७ पैकी ४ जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. केकरजवळा येथे तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष लाडाने यांच्या पॅनलने ११ पैकी ७ जागा जिंकत पुन्हा एकदा ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे. खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष ॲड. संतोष लाडाने यांच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानवे लागले. गजानन लाडाने यांच्या पॅनल ३ जागा मिळाल्या. भोसा येथे पंचायत समितीचे सदस्य दत्तराव जाधव यांचे पॅनल रिंगणात होते. ९ पैकी ७ जागा जिंकत या पॅनलने ग्रामपंचायत ताब्यात घेतली. पोहंडूळ येथे बाजार समितीचे संचालक माधव नानेकर यांनी ९ पैकी ७ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत ताब्यात घेतली. सावरगाव येथे विद्यमान सरपंच गजानन घाटूळ यांना पुन्हा एकदा ९ पैकी ९ जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. रूढी येथे शिवसेनेचे सर्कल प्रमुख पिंटू निर्वळ यांनी ९ पैकी ६ जागा निवडून आणत ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. प्रतिस्पर्धी किशोर निर्वळ यांच्या पॅनलला ३ जागा मिळाला. मगर सावंगी येथे विद्यमान सरपंच उमा मुकुंद मगर यांच्या पॅनलने विजय मिळवत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. कोथळा येथील ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार बहिणाबाई बाबू गाडेकर व प्रतिस्पर्धी उमेदवार रत्नमाला गौतम गोरे यांना समान १४० मते मिळाली. चिठ्ठी काढून उमेदवार निवडण्यात आला. त्यात रत्नमाला गौतम गोरे यांना विजयी घोषित करण्यात आले.
मतदारांनी युवकांकडे दिला गावचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:20 AM