जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरले आहेत. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पही १०० टक्के भरला असून, या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. राज्य जल आराखड्यात पूर्णा प्रकल्पाखाली १७२ दलघमी पाण्याची उपलब्धता दर्शविण्यात आली आहे. या पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे, ममदापूर या ठिकाणी बंधारे प्रस्तावित केले आहेत. या बंधाऱ्यांसाठी ३७.३६ दलघमी पाणी वापर प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी नाशिकच्या जल विज्ञान प्रकल्पाने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रही दिले आहे. तेव्हा परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित धानोरकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
बंधाऱ्यांअभवी तेलंगणात वाहून जातेय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:17 AM