शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, जिंतूर, पूर्णेमध्ये जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:46 PM

एकीकडे जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला असताना दुसरीकडे मात्र शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसूून येत आहे. गंगाखेड शहराला १५ दिवसांआड तर जिंतूर व पूर्णा शहरात ८ दिवसांआड नळांना पाणी सुटत असल्याने शहरी भागातील नागरिकांंना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एकीकडे जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला असताना दुसरीकडे मात्र शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसूून येत आहे. गंगाखेड शहराला १५ दिवसांआड तर जिंतूर व पूर्णा शहरात ८ दिवसांआड नळांना पाणी सुटत असल्याने शहरी भागातील नागरिकांंना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पूर्णेला दीड महिना पुरेलएवढाच पाणीसाठापूर्णा : शहराला गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या होत असलेल्या उपशाचे प्रमाण लक्षात घेता शहराला केवळ दीड महिना पुरेल एवढेच पाणी कोल्हापुरी बंधाऱ्यात आहे. त्यामुळे पूर्णेकरांची चिंता वाढणार आहे. त्याच बरोबर शहरातील नवीन वस्तीमधील आदर्शनगर, अली नगर, तात्यासाहेब नगर, अंबिका नगर, शिक्षक कॉलनी, हिंंगोली गेट आदी ९ ते १० नगरामध्ये १०-१० दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी हातपंप, बोअर आदी जलस्त्रोतांवर अवलंबून रहावे लागत आहे. याकडे नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन शहरात किमान चार दिवसाआड पाणीपुरवठा करून शहरवासियांची तहान भागवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.परभणीकरांनाही होतेय्१३ दिवसाआड पाणीपुरवठापरभणी : येथील महानगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: विस्ळीत झाले आहे. भर उन्हाळ्यात परभणीकरांना १३ दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. वसमत रस्त्यावरील राहाटी येथील बंधाºयातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी लागणारे पाणी सिद्धेश्वर प्रकल्पात आरक्षित करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन वेळा सिद्धेश्वर प्रकल्पातून राहाटी बंधाºयात पाणी सोडण्यात आले आहे. सध्याही बंधाºयात पाणी उपलब्ध आहे. मात्र मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासियांना १३ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांना अनेक अडचणींचा सामना करून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.जिंतूरकरांचे पाण्याअभावी हालजिंतूर : शहरातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. येलदरी धरणातून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्या येलदरी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात आहे. येलदरी धरण जरी मृत साठ्यात असले तरी या धरणात जिंतूर शहराला दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे; परंतु, नगरपालिकेच्या प्रभावी नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला आठ दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.मानवत शहराला होतोय५ दिवसांआड पाणीपुरवठामानवत : तालुक्यातील झरी तलावातून मानवत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात असल्याने सध्या तरी मानवतकरांना पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. झरी तलाव ते मानवत शहरापर्यंत पाण्याची गळती रोखण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या नगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे.पालममला ३ ठिकाणीहून केला जातो पाणीपुरवठापालम: तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक जानवत आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून पालम शहर परिसरातील गोदावरी नदी, गंगाखेड रस्त्यावरील विहीर, फळा रस्ता येथील विहिरीतून अशा तीन ठिकाणाहून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या नगरपालिकेच्या वतीने शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सध्या तरी पाणीटंचाईचे संकट शहरवासियांपुढे नसल्याचे दिसून येत आहे.पाथरी शहराला ३ दिवसाड पाणीपाथरी : शहरातील नागरिकांना ढालेगाव बंधाºयातून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा नगरपालिकेच्या वतीने मुबलक प्रमाणात होत असल्याने सध्या तरी शहरवासिय दुष्काळी परिस्थितीतही पाण्यासाठी निश्चिंत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.सेलूकरांना २ दिवसाआड पाणीपुरवठासेलू : जिल्ह्यातील काही शहरातील नागरिकांना पंधरा दिवसाआड तर काहींना आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. निम्न दुधना प्रकल्प जरी मृतसाठ्यात गेला असला तरी नगरपलिकेच्या नियोजनामुळे शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकंदरित जिल्ह्यातील शहरांचा पाणीपुरवठ्यासंदर्भात विचार केला असता सेलू शहर हे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.सोनपेठ शहराला ६ दिवसाआड होतोय पाणीपुरवठासोनपेठ : सोनपेठ शहराची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील वाणीसंगम येथील पाणीपुरवठा योजनेतील विहिरीमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे सोनपेठ शहराच्या काही भागामध्ये तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने भविष्यात सोनपेठ शहरवासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याचे योग्य नियोजन करून शहरवासियांना किमान चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियातून होत आहे.सहा गावांना टँकरने पाणीपुरवठासेलू : शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असताना तालुक्यात मात्र एप्रिल महिन्यात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पाणीस्त्रोत पूर्णत: आटत गेल्याने सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कसुरा व करपरा नदीपात्र कोरडे ठाक पडले आहे. तसेच जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने शेकडो हातपंप, पाणीस्त्रोत कोरडे पडले आहेत. विशेष म्हणजे करपरा व कसुरा नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या. तसेच योजनाही कुचकामी ठरत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याने तालुक्यातील तळतुंबा, वालूर, पिंपरी गोंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड या ग्रामपंचायतींनी टँंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर केले होते. त्यानंतर महसूल प्र्रशासनाने प्रस्तावांची छाननी व आवश्यक ते अहवाल तयार करून १ एप्रिल रोजी मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे पाठविण्यात आले होते.या सहाही प्रस्तावास ३ एप्रिल रोजी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सहाही गावांना १२ हजार क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा सुुरू करण्यात आला आहे. टँकरच्या तळतुंबा येथे ३, वालूर, पिंपरी गोंडगे येथे प्रत्येकी ४, नागठाणा कुंभारी येथे ३ तर पिंगळगाव गोसावी व गुळखंड येथे प्रत्येकी २ टँकरचेच्या फेºया केल्या जात आहेत.दरम्यान, सहा गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाकडून ३० जूनपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापूर्वीच १० गावांमध्ये पाणीस्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अधिग्रहणासाठीचे ३५ प्रस्ताव संंबंधित कार्यालयास सादर करण्यात आले आहेत.गोदाकाठच्या शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठागंगाखेड- गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहराला १० ते १५ दिवसाआड नळांना येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गोदाकाठी असलेल्या या शहराच्या काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड शहराला पाणीपुरवठा करणारी गोदावरी नदी कोरडीठाक पडल्याने शहरवासियांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ५० हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या गंगाखेड शहरातील जुन्या काही भागाला गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाºयातून तर नवीन वस्तीमध्ये मासोळी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र चालू वर्षात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने व मुळी बंधाºयाला दरवाजेच बसविले नसल्याने पावसाचे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र व मुळी बंधारा कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे गंगाखेड शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद आहे. त्याच बरोबर डोंगर भागातील माखणी शिवारात असलेल्या मासोळी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून शहराला १० ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ‘धरण उशाला, कोरड घशाला’ म्हणण्याचीे वेळ शहरवासियांवर आली आहे. गोदावरी नदीपात्रातून व मासोळी प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा केवळ मासोळी प्रकल्पातूनच होत असल्याने आठ दिवसाआड नळाला पाणी सोडण्याचे नियोजन असताना सुद्धा शहरवासियांना दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपालिका प्रशानसाने गोदा काठावर असलेल्या तारू मोहल्ला, संत जनाबाई

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई