सवारी गाड्यांची मागणी
परभणी : रेल्वे प्रशासनाने धर्माबाद- मनमाड मार्गावर सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. सध्या केवळ एक्स्प्रेस रेल्वे गाड्याच सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत व शेजारील जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कालव्यात साचला गाळ
परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. कालव्याला पाणी सोडल्यानंतरही टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अवैध धंदे जोरात
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मटका, जुगार यासह अवैधरित्या दारू विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यानंतर या अवैध धंद्यांवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसत आहे.
पाणी विक्री वाढली
परभणी : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, खासगी पाणी विक्री वाढली आहे. शहरात सध्या मुबकल प्रमाणात पाणी उपलब्ध असले, तरी व्यावसायिकांना मात्र पाणी पडू लागले आहे. त्यामुळे हॉटेल्ससह इतर व्यवसायासाठी विकतच्या पाण्याचा वापर होत आहे.