जून आणि जुुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने ताण दिला. त्यामुळे या पंधरा दिवसांत प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होईल, असे वाटत होेते. बाष्पीभवन तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा वापर केल्यास पाणीसाठा घटण्याची शक्यता होती. मात्र असा कोणताही परिणाम या पाणीसाठ्यावर झालेला नाही.
जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्प सद्यस्थितीला १०० टक्के पाण्याने भरलेला आहे. या प्रकल्पात २४.९०० द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात १३.११२ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ४८ टक्के एवढी आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ७४.२५ टक्के, सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवर बांधलेल्या जिल्ह्यातील पाच बंधाऱ्यांपैकी ढालेगाव बंधाऱ्यात ७३ टक्के, मुदगल बंधाऱ्यात ७३ टक्के आणि डिग्रस बंधाऱ्यात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा लक्षात घेता, पावसाच्या खंडाचा या पाणीसाठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे.
प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा...
येलदरी : ६०१.२८६
निम्न दुधना : २००.१३७
करपरा : २४.९००
मासोळी : १३.११२
डिग्रस : ४३.५३
ढालेगाव : ९.९८
मुदगल : ८.३८