सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर आहेत. निम्न दुधना प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्याव्दारे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जानेवारीत पहिल्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यातही पहिल्या आठवड्यात अशा तीन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किमी तर डावा कालव्या ६९ किमी आहे. दोन्ही कालव्या पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील सुमारे १३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.
दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. कालव्यात पाणी सोडले असले तरी टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याला अथळ्याची शर्यत करून टेलपर्यंत पोहचावे लागणार आहे. दरम्यान, टेलपर्यंत पाणी पोहण्यासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
विजेची समस्या
दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी मिळाले तरी ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या आहे. तुटलेल्या तारा, रोहित्रात जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कमी दबाने वीज पुरवठा होतो. तर अनेक वेळा फ्युज उडतात. पाणी सोडल्यानंतर चांगल्या दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.