जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रूग्ण - ३९,१७१
बरे झालेले रुग्ण - ३०,२३३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ८,०१२
होम आयसोलेशनमधील रुग्ण - ६,४१७
मास्क कसा वापरावा?
प्रत्येकाने चेहऱ्यावर दोन मास्क वापरावेत. यामध्ये नाक उघडे राहू नये, यासाठी सुरुवातीला एन-९५ आणि त्यावर सर्जिकल मास्क लावावा. कपड्याचे मास्क शक्यतो वापरू नये. त्यातही जे कपड्याचे मास्क फोर लेयरचे असतील, ते वापरण्यास हरकत नाही.
हे करावे
अ - सर्जिकल मास्क दररोज बदलावा.
ब - एन ९५ मास्क तीन ते चार दिवसाला साबनाने धुऊन घ्यावा.
क - घरातही मास्क घालून एकमेकांशी संवाद साधावा.
हे करू नका
अ - मास्क काढल्यावर तोंडावरून हात फिरवू नये.
ब - सर्जिकल मास्क कुठेही न फेकता तो कचराकुंडीत टाकावा.
क - मास्क काढून बोलू नये.
ड - गूटखा, पानसुपारी, तंबाखू खाऊन कुठेही थुंकू नये.
- डॉ.प्रशांत धमगुंडे, आयुर्वेदिक तज्ज्ञ, फॅमिली फिजिशियन.
मास्क काढून बोलण्याने वाढतो धोका
मास्क घालून तर सर्वच जण फिरत आहेत, पण नेमके जेव्हा एकमेकांना बोलण्याची वेळ येते, तेव्हाच नागरिक मास्क बिनधास्त काढून टाकतात. संसर्ग असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना तर अजिबात मास्क काढू नये. यातूनच रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.