लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड ते मुंबई या नव्याने सुरु झालेल्या राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेचे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परभणीरेल्वेस्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.नांदेड ते मुंबई ही राज्यराणी एक्सप्रेस १७६११/१७६१२ रेल्वे १० जानेवारीपासून सुरु झाली आहे. या रात्री १० वाजता नांदेड येथे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावर ही रेल्वेगाडी दाखल झाली. यावेळी मराठवाडा प्रवासी महासंघाच्या वतीने मॅकेनिकल इंजि.स्वामी, लोको पायलट चितळे, स्टेशन मास्तर देविदास भिसे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महासंघाचे अरुण मेघराज, रितेश जैन, श्रीकांत गडप्पा, मोहन प्रकाश, अजय कांबळे, नीलेश कामटीकर, समृद्धी कामटीकर, अब्दुल बारी, टी. कांबळे, अॅड. पुरुषोत्तम अटल, शहाजाद शेख आदींची उपस्थिती होती.पूर्णेतही रेल्वेचे स्वागतराज्यराणी एक्सप्रेसचे पूर्णा येथेही स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेचे चालक दिनेशकुमार सिंग, सहाय्यक चालक बबलू कुमार, गार्ड आर.आर.मीना, स्टेशन अधीक्षक महेंद्र निकाळजे, लोको निरीक्षक अहमद साहब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.हरिभाऊ पाटील, डॉ.गुलाब इंगोले, अॅड.अब्दुल सईद, संतोष एकलारे, शाम कदम, लक्ष्मीकांत कदम, सतीश टाकळकर, प्रमोद मुथा, गजानन हिवरे, आनंद अजमेरा, किरण कुल्थे, सुनील अवसरमोल, रौफ कुरेशी आदींची उपस्थिती होती.
परभणीत राज्यराणी एक्सप्रेसचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:26 AM