मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नववी वर्गात शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी दहावी वर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरवर्षीच नववीतून दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतेे, असा अनुभव आहे. मात्र यावर्षी ही संख्या साडेसहा हजारांपर्यंत पोहोचल्याने या विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली, याबाबत मात्र गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...
n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. काही बालविवाह रोखल्याचेही प्रकार समोर आले आहेत. बालविववाह हेदेखील एक कारण विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी असू शकते.
n परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते.
n कोरोना संसर्गामुळे हे विद्यार्थी परत दहावीच्या प्रवेशासाठी आले नसावेत.
ग्रामीण भागात संसर्ग वाढल्याचा परिणाम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या शहरातून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांची संख्या अधिक असली या मजुरांचे पाल्य शैक्षणिक प्रवाहात येण्याची प्रक्रिया संथगतीने झाली.
त्याचप्रमाणे मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक विद्यार्थी शैक्षिणक प्रवाहापासून दूर राहिले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत.
विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी ही कारणे असू, शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हिंगोली, नांदेड, बुलडाणा, जालना आदी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे हे विद्यार्थी गावाकडे परतल्यानंतर पुन्हा दहावी प्रवेशासाठी आले नसावेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळेही विद्यार्थी संख्या कमी झाली असावी.
विठ्ठल भुसारे, प्रभारी शिक्षणाधिकारी