शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

गावच्या थांब्यावर बस का थांबवली नाही? रस्ता अडवला, बसमध्ये घुसून चालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 7:28 PM

या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पाथरी - गावच्या थांब्यावर बस का थांबवली नाही? असा जाब विचारत एकाने बसच्या समोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर कॅबिन मध्ये घुसून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना पाथरी - सोनपेठ रस्त्यावर  टाकळगव्हाण तांडा येथे आज दुपारी घडली. घटनेनंतर चालकाने बस थेट ठाण्यात नेली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

पाथरी स्थानकातील बस ( क्रमांक एम एच २० बीएल ३९७०) परळी येथून पाथरी येथे येत होती. दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास टाकळगाव तांडा येथे धोंडीराम बापूराव राठोड याने बस समोर दुचाकी आडवी लावली. तसेच बसमध्ये घुसून चालक गणेश रंगनाथ कांबळे यांना  टाकळगव्हाण तांडा थांब्यावर बस उभी का केली नाही असा जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर चालकाने बस थेट पाथरी पोलीस ठाण्यात नेली. येथे चालक गणेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून धोंडीराम बापूराव राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सहपोलीस निरीक्षक बी.आर .बंदखडके व पोह. गजानन पिंपळपल्ले यांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी