शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

परभणी :शेतकऱ्यांमध्ये भांडण कशाला लावता? राहुल पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:02 AM

निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.निम्न दुधना प्रकल्पातून परभणी, सेलू, मानवत व जिंतूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. या अनुषंगाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला होता. याला जालना जिल्ह्यातील राजकीय नेते व काही शेतकरी विरोध करीत आहेत. शुक्रवारी धरणाच्या पायथ्याशी पाणी सोडण्यास विरोध करणाºया आंदोलकांसमोर बोलताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झालेला नाही व नदीपात्रात पाणी सोडू देणार नाही. बॅकवॉटरमधील मोटारी कदापि काढू दिल्या जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. या संदर्भात बोलताना परभणीचे शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, धरणाची निर्मितीच मुळात कमांड एरियासाठी झालेली आहे.शिवाय धरणात सध्या मुबलक पाणी आहे. परभणीसाठी १५ टीएमसी पाणी सोडले तरी त्याचा इतर योजनांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांमध्ये वाद कशाला लावता, असा सवाल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांना करून परभणीचे संपर्कमंत्री म्हणून दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जिल्हावासियांना पाणी देण्याची तुमची जबाबदारी नाही का, असा सवालही आ.डॉ.पाटील यांनी केला आहे. बॅकवॉटरमध्ये अनधिकृत मोटारीद्वारे उपसा सुरु आहे. त्यालाही आमची हरकत नाही. तरीही तुम्ही राजकारण कशासाठी करता आहात, असेही ते म्हणाले. खुद्द पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्यास हरकत नसल्याचे लेखी वरिष्ठांना कळविले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जनतेच्या भावना व गरजा लक्षात घेऊन सर्व शेतकरी लोणीकर यांनी एकसमान समजावेत व सकारात्मक भूमिका घेऊन पाणी सोडण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आ.डॉ.पाटील यांनी केले आहे.जिल्ह्यातील इतर नेत्यांची पाणी सोडण्याबाबत अस्पष्ट भूमिकानिम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. काही नेत्यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते; परंतु, सक्रिय भूमिका मात्र अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.दुसरीकडे नदीपात्रात पाणी सोडण्यास पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया यांच्यासह जालन्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी