भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:09 PM2024-02-12T15:09:10+5:302024-02-12T15:10:03+5:30

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे.

Will you join BJP? congress MLA Suresh Varpudkar explained the role | भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

- सत्यशील धबडगे
मानवत:
काँग्रेसचे मराठवाड्यातील मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कॉँग्रेसला रामराम करत आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे. यातच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुरेश वरपुडकर हे चव्हाण समर्थक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे वरपुडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आ. वरपुडकर यांनी भाजपत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मानवत शहरात आज काही विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार सुरेश वरपूडकर, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, नगराध्यक्ष बालकिशन चांडक  उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा दिल्याचे वृत्त धडकले. तसेच आ. चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य होते. 

आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? असे विचारले असता आ. वरपुडकर यांनी स्पष्टपणे 'नाही' असे सांगितले. आमदार वरपुडकरांनी तूर्त तरी नाही असे उत्तर दिले असले तरी आगामी काळात ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Will you join BJP? congress MLA Suresh Varpudkar explained the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.