जिंतूर (परभणी ) : अवैध प्रवासी वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा उलटून महिला ठार तर दोघे जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान माणकेश्वर शिवारात घडली.
अगलगाव येथून धान्य व प्रवासी घेऊन एक ऑटोरिक्षा (क्रमांक एम एच 22 व्ही 1078) माणकेश्वरकडे येत होता. माणकेश्वरजवळ येताच रिक्षाचा रॉड तुटल्याने तो उलटला. यात द्वारकाबाई शंकर जाधव (रा. अगलगाव 58 ) या जागीच ठार झाल्या. तर रुद्राक्ष संतोष जाधव (6), अर्जुन बबन पवार (50) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.