नजमा बेगम रियाजुद्दीन सिद्दिकी यांनी यासंदर्भातील तक्रार कोतवाली पोलिसांकडे दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार नजमा बेगम या गुरुवारी सकाळी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या एका महिलेकडे दर्गा रोड परिसरात आल्या होत्या. याठिकाणी या महिलेने नजमा बेगम यांना ऑटो रिक्षातून त्यांच्या घरी जेवणासाठी घेऊन गेल्या. यावेळी ऑटोरिक्षामध्ये इतर दोन ते तीन महिलाही होत्या. या सर्व महिलांनी जेवण झाल्यानंतर शीतपेयामध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ब्राह्मणगाव रस्त्यावर आणून याठिकाणी धाक दाखवून गळ्यातील ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ३३ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला, अशी तक्रार नजमा बेगम यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन बोधले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
गुंगीचे औषध देऊन महिलेस लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM