पालम : तालुक्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावाला विकासाची धुरा सांभाळण्यासाठी नवीन कारभारी मिळाला आहे. यात महिलांना पुरुषाच्या तुलनेत जास्त संधी मिळाली असून, २९ गावांचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला आहे.
पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायती असून, यापैकी पहिल्या टप्प्यात ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ़झाल्या आहेत. यापैकी २६ गावांत महिलांना आरक्षण सोडत झाली होती. मात्र, यापैकी पेठशिवणी, फळा, उक्कडगाव व पेठपिंपळगाव या ४ गावांत महिलांना आरक्षित होऊनही संबंधित प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने या जागांवर आरक्षण बदलून त्याच प्रवर्गातील पुरुष वर्गाला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुरुषांच्या आरक्षित जागेवरील महिलांना सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ५३ ग्रामपंचायतींपैकी २९ गावांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे.