शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

परभणी जिल्ह्यातील १४८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:20 AM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८६० विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १४८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून २०२ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८६० विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १४८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून २०२ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबवता एकत्ररित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित विशेष घटक योजना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने राबविण्यास शासनाने २७ एप्रिल २०१६ रोजी मान्यता दिली. या योजनेमध्ये नवीन विहिरींसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान व जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंगसाठी २० हजार रुपये, पंप संचासाठी २५ हजार रुपये, वीज जोडणी आकारासाठी १० हजार रुपये तर शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ४८९ नवीन विहिरींना मंजुरी देण्यात आली. तर ३७१ इतर बाबींसाठी मंजुरी दिली.२५ फेब्रुवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत लाभार्थ्यांना विहीर खोदकामासाठी मुदत देण्यात आली. मुदतीत विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत १४८ विहिरींची कामे लाभार्थ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहेत. तर २०२ विहिरींची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत उर्वरित विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर राहील, अशी माहिती कृषी विकास कार्यालयाकडून मिळाली.प्रत्येक तालुक्यासाठी : घेतले स्वतंत्र मार्गदर्शन शिबीर४जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील २०१८-१९ मधील लाभार्थ्यांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.४या शिबिरात २०१८-१९ मधील नवीन विहीर व इतर बाब लाभार्थ्यांमधील अपूर्ण लाभ दिलेल्या व अद्याप लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानंतर लाभार्थ्यांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जि.प.चे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी मार्गदर्शन केले.यावर्षी ४५९ विहिरींना दिली मंजुरी४जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील २०१९-२० मधील लाभार्थी निवडीसाठी १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कै.बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात सीसीटीव्हीच्या निगराणीत सोडत घेण्यात आली. यामध्ये ४५९ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली तर इतर बाबींमध्ये २४५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांना कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून निवडपत्र देण्याचे काम सुरु आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील गतवर्षी लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची कामे पूर्ण करुन घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत यावर्षीच्या लाभार्थ्यांच्या विहिरींची कामे सुरु होतील.-हनुमंत ममदे, कृषी विकास अधिकारी, जि.प.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीzpजिल्हा परिषद