शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

परभणी-जिंतूर महामार्गाचे काम सुरू होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:33 AM

जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असून, जिंतूर-परभणी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असून, जिंतूर-परभणी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील परभणी-वसमत, परभणी-गंगाखेड, परभणी-मानवत रोड व परभणी-जिंतूर या चारही महामार्गाचे काम सुरू आहे़ हे महामार्ग जागोजागी खोदण्यात आले आहेत; परंतु, कामाची गती म्हणावी, तशी दिसून येत नाही़ पावसाळा सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे़ अद्याप मजबुतीकरणाचे काम झालेले नाही़ परिणामी पावसाळ्यामध्ये चारही रस्त्यांवरून वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागणार आहे़ विशेष म्हणजे परभणी- जिंतूर हा रस्ता जागोजागी खोदून ठेवण्यात आला आहे़ पूल उभारणीचे कामही सुरू करण्यात आले आहे़; परंतु, सहा महिन्यांपासून हे काम बंद असल्याने पावसाळ्यात परभणी-जिंतूर हा महामार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़जिंतूर-परभणी रस्त्याचे काम आंध्र प्रदेशातील रुचिक कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले़ सुरुवातीच्या काळात रुचिक कंपनीने गतीने काम सुरू केले़; परंतु, अवघ्या तीन महिन्यानंतर कामाचा वेग मंदावला. हा रस्ता सिमेंट रस्ता होणार म्हणून जिंतूर, परभणी शहरातील हजारो नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता़ रस्त्याचे काम करीत असताना दोन्ही बाजुला रस्ता पूर्णत: उखडून टाकण्यात आला़ रस्ता तयार होत असल्याने नागरिकांनाही समाधान वाटत होते़; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे़ आज ना उद्या हे काम सुरू होईल, या अपेक्षेवर नागरिक होते़ परंतु, पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी उरला असताना अद्याप या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही़ त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे़ त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे़दरम्यान, परभणी- जिंतूर या महामार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ चार चाकी गाड्यांबरोबरच दुचाकींचीही मोठी वर्दळ असते; परंतु, हा रस्ता संबंधित गुत्तेदाराने ठिक ठिकाणी खोदल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे़ या धुळीतूनच दुचाकीस्वारांना मार्ग काढावा लागत आहे़ त्याचबरोबर रात्री-अपरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे छोटे मोठे अपघातही घडत आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे किमान एका बाजूचे तरी मजबुतीकरण करावे, जेणे करून पावसाळ्यात हा मार्ग बंद राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अपघातांच्या संख्येत वाढ४जिंतूर-परभणी रस्त्यावर दररोज दुचाकी व चार चाकी वाहनांमध्ये अपघात होत आहेत़ रस्त्यावरील खड्डे, प्रचंड धुळ व ठिक ठिकाणी सुरू असलेली पुलांची कामे यामुळे वाहनाधांना वाहने चालविणे अवघड झाले आहे़ परिणामी अपघात वाढले आहेत़४अपघातात निष्पाप जीवांचा बळी जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत; परंतु याकडे राजकीय पक्ष व प्रशासन डोळेझाक करीत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी रस्त्याच्या प्रश्नांकडे लक्ष घालून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे़काम रोखणाऱ्यांची नावे सांगा-उपाध्यायच्जिंतूर-परभणी या रस्त्याच्या कामासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याशी शिष्टमंडळाने संपर्क साधला तेव्हा उपाध्याय म्हणाले, रस्त्याच्या कामात कोण अडथळे आणत आहेत, त्यांची नावे सांगा़ कंत्राटदार नावे देण्यास भीत आहेत़ तेव्हा तुम्ही नावे सांगता मी कार्यवाही करतो, असे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी शिष्टमंडळास सांगितले़कन्स्ट्रक्शन कंपनीने अर्ध्यातच बंद केले रस्त्याचे कामच्आंध्र प्रदेशातील सुचिक कन्स्ट्रक्शन कंपनीला जिंतूर-परभणी या राष्ट्रीय महामार्गाचे २१२ कोटी रुपयांचे हे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे; परंतु, अद्यापपर्यंत ३० टक्केही काम पूर्ण झालेले नाही़ सहा महिन्यानंतर या रस्त्याची वाट लागली आहे़ नेते मंडळी काचा बंद करून या रस्त्याने वाहने चालवित आहेत़च्त्यामुळे अधिकाºयांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ शिवाय हे काम महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाकडे आहे़ त्यामुळे जिल्हास्तरावर सुद्धा यावर नियंत्रण नाही़ साधारण ३ लाख नागरिक व २०० गावांतील ग्रामस्थांची या रस्त्यावर वर्दळ असते़च्यासंदर्भात २० मे रोजी १ लाख नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे़ १ जून रोजी जिंतूर तालुका बंद, जेलभरो व रास्ता रोको आंदोलन करण्यात आहे़ त्यामुळे अर्धवट अवस्थेत बंद पडलेले काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे़च्जूनपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर हा रस्ता पूर्णत: पावसाळ्यात बंद पडणार आहे़ याकडे एकाही राजकीय पक्षाचे लक्ष नाही़ राजकीय पक्षांनी साधलेली चुप्पी ही निरुत्तर करणारी आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी हा प्रश्न उचलून धरला आहे़पुढाºयांच्या त्रासामुळे अडथळाच्जिंतूर-परभणी या रस्त्याच्या कामासंदर्भात सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांची भेट घेतली़ तेव्हा राजकीय पुढाºयांनी दिलेल्या त्रासामुळे कामात अडथळे आले़ आता हे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला तातडीने पत्र देऊन पाठपुरावा करू ; परंतु, राजकीय नेत्यांना आवरण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी म्हटले आहे़काम पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहणार- सारडाजिंतूर- परभणी रस्त्याचे काम सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे़ परंतु, कामाची मुदत संपत आलेली असतानाही काम अपूर्णच आहे़ पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी नागरी जनआंदोलन समिती सतत पाठपुरावा सुरू ठेवेल, असे अ‍ॅड़मनोज सारडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आठ दिवसांमध्ये काम सुरू होणार-कोटेचाया रस्त्याच्या संदर्भात रस्ते विकास महामंडळाचे उपविभागीय अभियंता कोटेचा यांच्याशी शिष्टमंडळाने संपर्क साधला असता, हे काम जी़ आऱ इन्फ्रा या कंपनीला दिले आहे़ आठ दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होईल़ जूनपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येई, असे ते म्हणाले़

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग