नियमांचा बोजवारा
परभणी : येथील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. विशेषत: फिजिकल डिस्टन्सचा अवलंब करण्याचा विसर नागरिकांना पडला आहे.
विरुद्ध मार्गाने वाहतूक
परभणी : शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोरील रस्ता वन-वे असताना काही नागरिक विरुद्ध मार्गाने वाहने चालवित आहेत. त्यामुळे इतर नागरिकांना याचा त्रास होत आहे. पोलीस कारवाईची मागणी होत आहे.
वाहतुकीस अडथळा
परभणी : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने समोरील मुख्य रस्त्यालगतच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे एसबीआय बँकेकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रहदारीवर परिणाम होत आहे.
‘लोकल रेल्वे सुरू करा’
परभणी : नांदेडमार्गे औरंगाबाद व औरंगाबादमार्गे नांदेड, परभणी ते परळी या मार्गावर लोकल रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. लोकल रेल्वे नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.