परभणी : बॅनर फाडण्याच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी रात्री तीन आरोपींना अटक केली आहे़
येथील राजहंस हॉटेलसमोर लावलेले बॅनर फाडण्यावरून ६ जून रोजी अमोल तुरे या युवकाचा खून झाला होता़ याप्रकरणात ७ जून रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपींना शोधण्यासाठी दोन पथकांची स्थापना केली़ हे दोन्ही पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले़ परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, नगर आदी ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यात आला़ हे आरोपी देवगावफाटा मंठा रस्त्यावर असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर दोन्ही पथक त्या ठिकाणी दाखल झाले़ पाठलाग करून आरोपी शेख सोहेल उर्फ ईल्ला पिता शेख करीम (रा़ सिद्धार्थ नगर), शेख शकील शेख खाजा (रा़ धनूबाई प्लॉट), बाळासाहेब सुभाष सोनवणे (रा़ धनूबाई प्लॉट) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले़ तसेच त्यांच्या जवळील बुलेट गाडीही जप्त केली आहे़ घटनेनंतर २४ तासांत तीन आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे़
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, हवालदार हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसुंदरे, मधुकर चट्टे, शिवाजी धुळगुंडे, सय्यद मोईन, संजय घुगे, सय्यद मोबीन, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, किशोर चव्हाण, विशाल वाघमारे यांच्या पथकाने केली़
पुणे, नगर येथे भ्रमंतीआरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी हिंगोली, औरंगाबाद येथून पुणे, अहमदनगर येथे गेले होते. तेथे फिरल्यानंतर ते मंठा भागातील देवगाव फाटा या भागात आले. पोलिसांनी आरोपीकडून बुलेट गाडी जप्त केली आहे.