येथील ग्रामपंचायत यापूर्वी कांतराव झरीकर यांच्या गटाच्या ताब्यात होती. या निवडणुकीत मात्र शिवसेना पुरस्कृत जनसेवा पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केेले आहे. शिवसेनेचे गजानन देशमुख व पंचायत समितीचे उपसभापती डॉ. प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनल आणि स्वराजसिंह परिहार, दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिवस्वराज्य पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी मतमोजणीअंती जनसेवा पॅनलचे सुनील रावसाहेब गायकवाड, गोदावरी लिंबाजी अंभुरे, ज्योती गजानन हेंडगे, अच्युत बापुराव चोरमले, दीपक राजेश्वर देशमुख, रेवती दत्तराव जगाडे, राईन दादाराव इनामदार, रेशमा नारायण गवळी, शेख अशिफ इस्माईल, केशरबाई महेश मठपती हे दहा उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवस्वराज्य पॅनलचे सुमय्या अतिख इनामदार, जना सखाराम नन्नवरे, कैलास तुकाराम रगडे, अभिजीत गणपत परिहार, अस्मिता गौतम ढाले, दिलीप प्रभाकर सावंत, पुनम पुरुषोत्तम मठपती हे ७ उमेदवार विजयी झाले आहेत.
झरी ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:20 AM