शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जिल्हा परिषदेची कार्यालयेदेखील होत आहेत स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबवून गावे स्वच्छतेकडे नेण्याचे काम करणाऱ्या येथील जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबवून गावे स्वच्छतेकडे नेण्याचे काम करणाऱ्या येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयातही स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कामांना सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये ‘स्वच्छ माझे कार्यालय’ हे अभियान आता राबविले जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच कार्यालयांमध्ये स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. दिनांक ६ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी सर्व शिक्षा अभियान, महिला व बालकल्याण विभाग या कार्यालयांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. त्याचप्रमाणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्यासह दोन्ही कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी जिल्हा परिषदेंतर्गत विविध उपाययोजना आणि कामांना सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेतल्या जात असून, त्यात त्या-त्या विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेऊन टाकसाळे अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. केवळ कार्यालयातील बैठकांवरच भर न देता, ग्रामीण भागात दौरे करून प्रत्यक्ष कामाची पाहणीही त्यांनी आतापर्यंत केली आहे.

त्याचप्रमाणे आता कार्यालयांची स्वच्छता करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विभागामध्ये असलेले जुने दस्तावेज व्यवस्थित ठेवणे, त्यांच्या कालक्रमानुसार संचिका तयार करणे, कोणताही दस्तावेज लगेच उलपब्ध होईल, अशा पद्धतीने मांडणी करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छता मोहिमेबरोबरच आता कार्यालयीन स्वच्छतेवरही भर देण्यात आला असून, ‘स्वच्छ माझे कार्यालय’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.