महाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:43 IST2018-11-13T20:35:59+5:302018-11-13T20:43:40+5:30

सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेला षठ पूजेचा सण आज महाराष्ट्रातही उत्तर भारतीय समाजाने उत्साहात साजरा केला.
छठपूजेनिमित्त महिला उपवास करून सूर्याची उपासना करतात. यावेळी फळे तसेच गोडधोड नैवैद्य दाखवला जातो.
मुंबईतील चौपाट्यांवर छठ पूजेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
नाशिकमध्येही छठपूजा उत्साहात साजरी झाली.
छठ पूजा झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देताना महिला.