Dussehra 2020 Wishes : दसऱ्या निमित्त नातेवाईक आणि परिजनांना खास शुभेच्छा देऊन उत्सव करा साजरा

By manali.bagul | Published: October 25, 2020 09:06 AM2020-10-25T09:06:32+5:302020-10-25T09:29:40+5:30

Dasara Wishes In Marathi

आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात.

या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वती पूजन , अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी आपल्या मित्रांना, आप्तांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या माध्यमातून तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या.

सध्या कोरोनाचा कहर असल्यामुळे लोक एकमेकांना भेटू शकत नाही. ऐरवी दसऱ्यानिमित्त खूप लगबग पाहायला मिळते. पण सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे लोक घरच्याघरी आपला आनंद साजरा करतील. ही खास शुभेच्छापत्रे देऊन तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता.