१५ वर्षांपूर्वीचा नवस फेडला; साईचरणी रत्नजडीत हार, भक्ताचं मोठं दान By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:30 PM 2023-02-13T12:30:50+5:30 2023-02-13T12:39:56+5:30
शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गत वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गत वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, गतवर्षात निघालेल्या दक्षिणा पेटीत 166 कोटी, देणगी काउंटरवर 66 कोटी, 25 किलो सोनं आणि या व्यतिरिक्त 326 ग्रॅम चांदी सुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीचे साईमंदिरास यंदा 1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे.
31 डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. परंतु, जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता अनेकांना असते. दरम्यान यंदा हे दान भरभरून मिळाला असून जवळपास चारशे कोटींचे दान साईभक्तांनी साईचरणी अर्पण केले आहे. यंदाच्यावर्षातही हा दानयोग सुरूच आहे.
पंधरा वर्षांपूर्वी केलेला नवस फेडण्यासाठी हैदराबाद येथील एका भाविकाने साईबाबांना रत्नजडित सुवर्णहार, चांदीचे ताट, ग्लास, प्लेट, वाटी, तसेच दोन लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. या सर्व वस्तूंचे मूल्य जवळपास तीस लाख रुपये आहे.
राजलक्ष्मी भूपाल व कामेलक्ष्मी भूपाल, अशी या देणगीदार दाम्पत्याची नावे आहेत. रविवारी माध्यान्ह आरतीपूर्वी त्यांनी ३१० ग्रॅम वजनाचा सुवर्णहार अर्पण केला.
या हारात अनेक रत्न जडवलेले आहेत. याशिवाय ११७६ ग्रॅम वजनाचे व ३१ हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्लेट व ग्लास या वस्तूंचाही देणगीत समावेश आहे.
दरम्यान, हैदराबादेतील या भाविकाने दोन लाख रुपयांचा धनादेशही मंदिर संस्थानला दिला आहे. साई संस्थानच्या वतीने या देणगीदार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.