अकोला बंद : मोर्चा, रास्तारोको व दगडफेकीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:16 IST2018-01-03T20:20:09+5:302018-01-04T02:16:26+5:30

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आठवले गट शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील वाशिम रोड बायपासस्थित पक्षाच्या कार्यालयापासून निघालेला मोर्चा मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.
मोर्चात रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेकडो युवकांनी मोटारसायकल मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
अशोक वाटिका या ठिकाणी हजारो युवक, महिला व पुरुष गोळा झाले. चौकात आल्यावर या ठिकाणी युवकांनी नारेबाजी केली
अशोक वाटिका येथे जमलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला.
आंदोलकांनी खदान परिसरातील एटीएम फोडले.
आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली.
आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली.
तुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या.
तुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या.
आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली.
संतप्त अनुयायांनी दुपारी अशोक वाटिका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करून आपल्या रोष व्यक्त केला.
बंद मुळे अकोला बसस्थानकावर असा शुकशुकाट होता.
अकोल्यात अडकलेल्या गाड्यात ५ शिवशाहींचाही समावेश आहे.
एका दिवसात अकोला आगारचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
अकोला आगारासह मंगरुळपीर, वाशिम, अमरावती, पांढरकवडा, कारंजा आणि वाशिम डेपोच्या ६0 च्यावर गाड्या अकोल्यातच थांबविण्यात आल्यात.
खबरदारी म्हणून अकोल्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते.
भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती.
भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती.
भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
सकाळपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होते.
प्राथमिक तपासात अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक आंदोलकांची ओळख पटली असून, काही आंदोलक पोलिसांच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत.