"ज्या शाळेत आईचं शिक्षण, लेकाच्याहस्ते त्या संस्थेच्या शतक महोत्सवाचं उद्घाटन" By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:46 PM 2023-04-12T22:46:41+5:30 2023-04-12T22:59:14+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आणि प्रेरणादायी राहिला आहे. एक साधारण आमदार ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने ते नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आणि प्रेरणादायी राहिला आहे. एक साधारण आमदार ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने ते नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी आहेत
देवेंद्र फडणवीस यांना घरातून राजकीय वारसा लाभला होता, त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस याही मंत्री होत्या. पण, आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्व गुणांमुळे देवेंद्र फडणवीस हे वयाच्या ४४ व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.
नागपूरच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांचं शिक्षण विदर्भातील शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेत झालं. म्हणजे तेच देवेंद्र यांचं अजोळ.
देवेंद्र फडणवीसांना राज्याचे उपमुख्यमंत्री असताना, याच संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, या शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाचे उद्घाटनही देवेंद्र यांच्याचहस्ते करण्यात आले.
माझ्या आईचे शिक्षण ज्या संस्थेत झाले त्या ‘शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थे‘च्या शतक महोत्सवाचे उद्घाटन करण्याची संधी आज दुपारी मला अमरावती येथे मिळाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सांगितले.
खासदार नवनीत राणा, अनिलजी बोंडे, रामदासजी तडस, आमदार सर्वश्री प्रवीण पोटे, प्रा. डॉ. अशोकजी उईके तसेच बी. टी. देशमुख सर, अंजलीताई देशमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते.
विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे म्हणत या संस्थेशी आणि शाळेशी असलेली भावनिक जोड देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
शंभर वर्षांच्या शताब्दी पूर्ती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या अतिशय ऐतिहासिक संस्थेत उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, याबद्दल संस्थेचे फडणवीस यांनी आभारही मानले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस नेहमीच आपल्या कुटुंबीयांसमवेतचेही काही भावनिक क्षण शेअर करत असतात. त्यापैकीच एक आईच्या आठवणींना उजाळा देणारा हा क्षण होता