Renault 10 years celebration: यंदा घ्या, 2022 मध्ये पैसे भरा! रेनोला भारतात 10 वर्षे पूर्ण; नवी कार लाँच, भन्नाट ऑफर्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 12:36 PM 2021-08-07T12:36:20+5:30 2021-08-07T12:41:26+5:30
Renault 10 years celebration: फ्रान्सची मुख्य वाहन निर्माता कंपनी Renault (रेनो) ला भारतात येऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीने हा दिवस खास बनविण्यासाठी लोकप्रिय झालेली Renault Kiger (रेनो काइगर) एसयुव्हीसाठी नवीन RXT (O) व्हेरिअंट लाँच केले आहे. Renault Kiger RXT (O) Variant Launch in India know Price : फ्रान्सची मुख्य वाहन निर्माता कंपनी Renault (रेनो) ला भारतात येऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीने हा दिवस खास बनविण्यासाठी लोकप्रिय झालेली Renault Kiger (रेनो काइगर) एसयुव्हीसाठी नवीन RXT (O) व्हेरिअंट लाँच केले आहे.
याचबरोबर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना लाँच केल्या आहेत. Renault Kiger च्या नव्या व्हेरिअंटची बुकिंग 6 ऑगस्टपासून सुरु झाले आहे. (Buy a Renault Kwid, Triber or Kiger Now & Pay in 2022)
आजच्या दिवशी रेनोने काइगरचे RXT (O) व्हेरिअंट लाँच केले आहे. Renault Kiger RXT(O) मध्ये 1 लीटरचे इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक अशा दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.
Kiger चे हे नवीन व्हेरिअंट RXZ व्हेरिअंटवर आधारीत आहे. नव्या व्हेरिअंटमध्ये प्रिमियम अपग्रेड मिळणार आहेत. यामध्ये ट्राई-ऑक्टा एलईडी प्युअर व्हिजन हेडलँप, 40.64 cm डायमंड कट अलॉय व्हील्स असतील.
हे फीचर कमी किंमतीत उपलब्ध केले जातील. यामुळे रेनोला या काइगरला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
Kiger RXT(O) व्हेरिअंटमध्ये अन्य फीचरबाबत बोलायचे झाले तर यामध्ये PM2.5 अॅडव्हान्स अॅटमॉस्फेरिक एअर फिल्टर देण्यात आला आहे. यामुळे केबिनमधील हवा स्वच्छ राहणार आहे.
केबिनमध्ये वायरलेस स्मार्टफोन रेप्लीकेशन फंक्शन मिळते. याद्वारे प्रवासी आपले फोन 20.32 cm डिस्प्ले लिंक फ्लोटिंग टचस्क्रीनला कनेक्ट करू शकतात.
आपल्या सेलिब्रेशन ऑफरअंतर्गत रेनो ने 6 ते 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळसह पूर्ण देशभरात 'फ्रीडम कार्निव्हल'ची घोषणा केली आहे. कंपनीने या राज्यांमध्ये 90000 रुपयांपर्यंतचा फायदा आणि वेगवेगळे फेस्टिव्ह ऑफर लाँच केले आहेत. या राज्यांमध्ये गणेशोत्सव आणि ओणम सारख्या उत्सवांमुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
'Buy Now, Pay in 2022' फ्रीडम कार्निव्हल'मध्येच रेनो कार बुक करणाऱ्या ग्राहकांना आणखी एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये एक्स्चेंज बोनस व्यतिरिक्त कंपनीने क्विड, ट्रायबर आणि काइगर या कार खरेदी केल्यास 'Buy Now, Pay in 2022' स्कीमचीही घोषणा केली आहे.
या योजनेनुसार ग्राहक रेनोच्या कार खरेदी करताना हा पर्याय निवडू शकणार आहेत. यामध्ये कार आता खरेदी करायची आणि सहा महिन्यांनी म्हणजेच 2022 पासून त्याचे हप्ते देण्यास सुरुवात करायाची आहे.
महत्वाचे म्हणजे रेनोने गेल्या 10 वर्षांत 7 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. सध्याच्या ग्राहकांना लॉयल्टी बेनिफिट्स देण्यात येणार आहे. कार्पोरेट आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत.