नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स By देवेश फडके | Published: February 24, 2021 02:01 PM 2021-02-24T14:01:19+5:30 2021-02-24T14:06:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. कंपनी नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नेमके कोणते बदल करते आणि ग्राहकांना कोणत्या नव्या सोयी, सुविधा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात आले असून, मारुती सुझुकी स्विफ्टचा मिडलाइफ मेकओव्हर करण्यात आला आहे. (2021 maruti suzuki swift facelift launched in India) भारतातील आघाडीची कार निर्माता असणाऱ्या Maruti Suzuki कडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच अत्याधुनिक सोयी, सुविधा देण्यासाठी भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हॅचबॅक प्रकारात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या Swift चे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. कंपनी नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नेमके कोणते बदल करते आणि ग्राहकांना कोणत्या नव्या सोयी, सुविधा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (2021 maruti suzuki swift facelift launched in India)
अखेर Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात आले असून, मारुती सुझुकी स्विफ्टचा मिडलाइफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल.
नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन फ्रंट फॅसिआसह सादर करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल दिले आहेत. यासह नव्या स्वीफ्टमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे.
Maruti Suzuki Swift चे थर्ड जनरेशन मॉडेल सन २०१७ पासून भारतात उपलब्ध करण्यात आले आहेत. कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही.
नवीन Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये हेडलॅम्प्स, क्रोम, ग्रील, बम्पर यांमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. यामुळे गाडीचा फ्रन्ट लूक अधिक आकर्षक दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंटिरियरमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. आयडॉल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन के-सीरिज १.२ लीटर ड्युअल जेट डुअल VVT इंजिन देण्यात आले आहे.
क्रूझ कंट्रोल, कलर्ड मल्टी इन्फोर्मेशन डिस्प्ले आणि की यासह काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. सात इंचांच्या स्मार्टप्ले स्टूडियो इंफोटेन्मेंट सिस्टिमसह अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले देण्यात आला आहे. क्लायमेट कंट्रोल, पुश बटन, हिल होल्ड कंट्रोलही देण्यात आले आहेत.
Maruti Suzuki Swift मॅन्युअर ट्रान्समिशनमध्ये २३.२० तर ऑटोमॅटिक गियर सिस्टिममध्ये २३.७६ कि.मी. प्रति लीटरचे मायलेज मिळते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत ५.७३ लाख रुपये आहे.
गतवर्षात स्वीफ्टच्या फेसलिफ्टने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली. आता यानंतर भारतातही स्वीफ्टच्या फेसलिफ्ट व्हर्जनची विक्री सुरू करण्यात आली आहे.