7 एअरबॅग्स, 5-स्टार सेफ्टी! जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाली न्यू Tata Safari, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 04:41 PM2023-10-17T16:41:56+5:302023-10-17T16:45:37+5:30

Tata Motors ने लोकप्रिय SUV Safari चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे.

2023 Tata Safari: भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी Tata Motoresने आज आपल्या लोकप्रिय SUV सफारीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही मागील मॉडेलपेक्षा जास्त चांगली झाली आहे.

आकर्षक लुक आणि पॉवरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या, नवीन टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16.19 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलसाठी 25.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.

कंपनीने अनेक मोठ्या बदलांसह टाटा सफारीचे न्यू जनरेशन मॉडेल लॉन्च केले आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत. शिवाय, मायलेजही पूर्वीपेक्षा वाढले आहे.

कंपनीने यात 2 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन दिले आहे, जे 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Adventure+ व्हर्जनमद्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. यात तीन ड्रायव्हिंग मोड (इको, सिटी आणि स्पोर्ट) मिळतात.

टाटा मोटर्सने नवीन टाटा सफारी चार मुख्य ट्रिममध्ये उपलब्ध केली आहे. यामध्ये स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि अॅक्प्लिश्डचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, Tata Safari चे मॅन्युअल वेरिएंट 16.30 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 14.50 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते.

नवीन Safari मध्ये मोठ्या आकाराची 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, तसेच डॅशबोर्ड आणि नेव्हिगेशनसह नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहेत. स्टीयरिंग व्हीलचे डिझाइन देखील बदलण्यात आले आहे.

नवीन टाटा सफारी सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, अॅडल्ट सेफ्टीमध्ये नवीन सफारीला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 34 पैकी 33.05 गुण मिळाले आहेत. तर चिल्ड्रन सेफ्टीमध्ये 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. एकूणच, ही SUV 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येते.

सुरक्षेसाठी यात 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, अॅम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक पॉवर टेलगेट आणि 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये 7 एअरबॅगचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीने त्यात Advanced Driving Assist System (ADAS) देखील दिली आहे.